स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज


रत्नागिरी : जिल्ह्यात उद्या (२ डिसेंबर) जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, चिपळूण, राजापूर, खेड या ४ नगरपालिका, तर देवरूख, लांजा व गुहागर नगरपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे.
रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, देवरूख, लांजा व गुहागर नगरपंचायत पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील निवडणुकीतील १०१ प्रभागांसाठी, २०० मतदान केंद्रांवर २ डिसेंबर रोजी मतदान, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीचा प्रचार काळ, मतदानाचा दिवस व मतमोजणीनंतरचा काळ या संपूर्ण प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच निवडणुका खुल्या व भय मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाने बंदोबस्त नियोजन केलेले आहे.

निवडणूक बंदोबस्ता एकूण ५७ पोलीस अधिकारी, ५८९ पोलीस अंमलदार, आरसीपीचे २ तुकड्या, एसआरपीएफ १ कंपनी व ५५० होमगार्डचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सर्वं बॉर्डर चेकपोस्ट वर योग्य मनुष्य बळाचा वापर करण्यात येत आहे व प्रभावी वाहन तपासणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ११ ठिकाणी भरारी पथके (FST) व २५ ठिकाणी स्थैतिक संनिरीक्षण चमू (SST) तैनात करण्यात आली आहेत. यासाठी एकूण ५० पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६ अन्वये एकूण ५७६, कलम १२७ अन्वये ०३, कलम १२८ अन्वये २८, कलम १२९ अन्वये ६८ कारवाया करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायदा, १९८१ (MPDA Act) अन्वये ०१, तसेच ०९ तडीपारीचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button