चिपळूण तालुका बळीराज सेना महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी दुर्वा पानवलकर

गुहागर : दोन दिवसांपूर्वी बळीराज सेनेच्या दापोली तालुका अध्यक्षपदी जेष्ठ नेते काशीराम पोसकर यांची निवड झाल्यानंतर आता चिपळूण तालुका महिला आघाडीसाठी जिल्हा अध्यक्ष यांनी ग्रामीण भागातील महिलेला तालुका अध्यक्ष पदाची संधी दिली आहे. ताम्हणमळा अति ग्रामीण भागातील सौ. दुर्वा दीपक पानवलकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम यांच्या कोकण दौऱ्यानंतर पक्षाने आपली राजकीय ताकद चांगलीच वाढविली आहे. श्री. पोसकर
यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या. ताम्हाणे येथे झालेल्या एका बैठकीत सौ. पानवलकर यांची नियुक्ती करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या बाबत बोलताना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे म्हणाले, “उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बळीराज सेनेचे संघटन पक्षप्रमुख अशोक वालम यांच्या आदेशानुसार वाढत आहे. चिपळूण तालुकाध्यक्ष पदाचा तिढा देखील येत्या आठ दिवसांत सोडविण्यात येईल. तसेच युवक अध्यक्ष देखील देण्यात येणार आहे बळीराज सेनेची ताकद आता वादळी ठरणार असून सर्व सामान्य जनतेला एक नवा पर्याय म्हणून बळीराज सेनेचे नाव घेतले जात आहे. आजच्या चिपळूण तालुका दौऱ्यात बळीराज सेनेचे विविध गावातून पदाधिकारी यांनी चर्चा सत्र मध्ये सहभाग नोंदविला.”
“यावेळी गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड व तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, गुहागर विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी प्रमुख सौ. ऐश्वर्या कातकर यांच्यासह चिपळूण तालुक्यातील विविध भागातील नवे कार्यकर्ते सहभागी झाले होते. चिपळूण तालुक्यात आता बळीराज सेनेचे नवे पर्व सुरू झाले असून बेसिक तसेच युवक व महिला आघाडीमध्ये सर्वच्या सर्व नवीन चेहरे देण्यात येतील.”

सामाजिक संघटन आणि ग्रामीण व शहर भागात जनतेची सेवा करण्यासाठी बळीराज सेना सर्व ताकदीनी उतरेल. चिपळूण शहरासाठी नवा अध्यक्ष लवकरच देण्यात येणार आहे. या बाबतची चाचपणी सुरू असल्याचे श्री. कांबळे यांनी‌ सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button