दिसायला हिरोपेक्षा कमी नाही, इन्स्टाला 10 लाख फॉलोअर्स, पठ्ठ्यानं घरी EDची धाड पडल्याचं सांगून गर्लफ्रेंडला फसवलं, फेमस रीलस्टारला.

ठाणे (डोंबिवली) : भावी वधूशी आधी इन्टाग्रामवर ओळख करुन मैत्री केली, त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचं सुत जुळलं. आरोपीने लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्यातच माझ्या घरावर ईडीची धाड पडली असून यातून सोडविण्यासाठी भावी वधूला 92 लाख 75 हजार रूपयांचा गंडा घातल्याची घटना घडली होती. ही घटना डोंबिवली पश्चिम भागात उघडकीस आली होती.

आरोपीला बेड्या
याप्रकरणी पीडित भावी वधूने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे रीलस्टारला बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश प्रकाश रामगुडे (वय 30) असं अटक केलेल्या रीलस्टारचं नाव असून त्याने आतापर्यत 4 ते 5 तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलीस साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे. आरोपी रीलस्टार शैलेशचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स असल्याची माहिती पोलिसांनी काढली आहे. फसवणुकीतून मिळालेलं सोनं त्याने ठाण्यातील सोनारांना विकलं होतं. ते पोलिसांनी जप्त केलं आहे. शैलेशने आतापर्यंत किती तरूणी अन्य कोणाची फसवणूक केली आहे. या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button