
संगमेश्वरातील नव्याने नुतनीकरणाचे शौचालयाची दारे पंधरा दिवसांतच पडू लागली
संगमेश्वर तालुक्यातील नव्याने बांधलेल्या एसटी स्थानकाचे लोकार्पण होवून अवघे पंधरा दिवस झाले असतानाच स्थानकातील शौचालयाचे दरवाजे तुटून पडले आहेत. नुकतेच भव्य सोहळ्यात या स्थानकाचे उदघाटन करण्यात आले होते. परंतु काही दिवसात सुविधांची दयनीय अवस्था समोर येत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दि. ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात आलेल्या संगमेश्वर एसटी स्थानकात अनेक सुविधा उभारण्यात आल्या. मात्र स्थानक परिसरातील काही कामे घाईघाईत, फक्त उदघाटनाचा दिवस गाठण्यासाठी करण्यात आल्याचे स्थानिकांकडून बोलले जात होते. त्याचाच प्रत्यय आता शौचालय कामात दिसून आला आहे. दरवाजे तुटणे, लॉकिंग सिस्टीम न चालणे, टाईल्स तडकणे अशी दृश्ये स्थानकात दिसत आहेत. नुकतेच लोकार्पण झालेल्या या स्थानकात अशा प्रकारचे दोष दिसल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे.
www.konkantoday.com




