
डेरवणमध्ये राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का; ठाकरे सेनेत प्रवेश
चिपळूण : तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटात डेरवण गावातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी १० नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकरे जिल्हा परिषद गटातील डेरवण गावातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून, अनेकांनी ठाकरे शिवसेनेत आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गुहागर येथे पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी गुहागरचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, प्रवीण ओक, विनायक मुळे जयदेव मोरे, सिद्धिविनायक जाधव असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेश केल्यांमध्ये माजी सरपंच देवेंद्र शिर्के, सुमित गुजर, आनंद गुजर, राजेश सावंत, केशव जाधव, दिनेश चव्हाण, संतोष कदम, राजेंद्र चव्हाण, अभिजीत सावंत, आर्यन कदम आदींचा समावेश आहे.




