
भाट्ये ब्रिज ते राजीवडा रस्ता साकारण्याच्या हालचाली वेगवान, नारायण राणेंकडे मागणी
रत्नागिरीतील भाट्ये ब्रिजला लागून राजीवड्याकडे जाणार्या शहर विकास आराखड्यातील रस्त्याचे काम अखेर पुन्हा चर्चेत आले आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या अलीकडील ’जनता दरबारात’ या रस्त्याचा मुद्दा मांडण्यात आला असून, राणे यांनी यासंदर्भात रत्नागिरी नगरपरिषदेला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या रस्त्याचा उल्लेख शहर विकास आराखड्यात सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वीपासून असूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नव्हती. या प्रकरणाकडे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी लक्ष वेधले. त्यांनी आराखड्याचा नकाशा सादर करून हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी खासदार राणे यांच्याकडे केली आहे.www.konkantoday.com




