चिपळूण शहरातील मच्छि-मटण मार्केट गाळे लिलावाला प्रतिसाद नाही


चिपळूण शहरातील मच्छि मार्केटमधील गाळ्यांच्या लिलावाची निविदा भरण्याची मुदत संपली आहे. १० दिवसांच्या या मुदतीत एकाही व्यावसायिकाने या प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे नगर परिषद लवकरच फेरनिविदा काढणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या व यामुळे नगर परिषदेचे करोडो रुपयांचे नुकसान होणार्‍या मटण-मच्छी मार्केटच्या लिलावासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी दुरूस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असून सर्व सुविधा उपलब्ध नसताना यातील गाळ्यांचा लिलाव करू नये, तरीही केल्यास आपल्याविरोधात कायदेशीर दाद मागावी लागेल अशी नोटीस ऍड. विक्रांत वाडकर यांच्यामार्फत नगर परिषदेला दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button