राजापूर शहरानजीकच्या कोदवली येथील परिसर पुन्हा कचर्‍याचे ढिग


राजापूर शहरानजीकच्या कोदवली येथील पुनवर्सन वसाहत कचरा डंपिंग ग्राउंड बनले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी मोकाट जनावरे प्लास्टिक वस्तू खात असताना दिसत आहेत. येथील कचरा उचलण्यासाठी घंटा ग्रामपंचायीतच्यावतीने गाडी उपलब्ध केली मात्र कचरा इपिंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने ती शोभेचे बाहुले ठरले आहे.
पुनवर्सन वसाहत पुन्हा एकदा कचरा डेपो बनली आहे. असे असताना काही नागरिक रस्ता सफाई करत असून कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत आहे. तालुक्यातील जास्त महसूल गोळा करणारी कोदवली ग्रामपंचायत सध्या कचरा डंपिंग ग्राउंड बनली आहे.
ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राजापूर शहरात १९९३ साली पूररेषा अस्तित्वात येऊन शहरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी शासनाने शहराजवळच कोदवली ग्रामपंचायत हद्दीत पुनर्वसन वसाहत निर्माण केली आहे. सध्या या भागात साधारण ३५० भुखंडांवर पूरग्रस्त रहिवास करत आहेत. शहरातील पूरग्रस्त नागरिकांसाठीची ही वसाहत कोदवली ग्रामपंचायत हद्दित समाविष्ट करण्यात आली आहे. या पुनर्वसन भागातील नागरिकाना पाणीपुरवठा राजापूर नगर परिषद करत असली तरी मालमत्ता कर मात्र कोदवली ग्रामपंचायत वसूल करत आहे. येथील नागरिकाच्या प्राथमिक गरजांकडे कोदवली ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button