
तेजस्विनी आचरेकर यांची राष्ट्रीय ज्युनियर तायक्वॉंदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.
लांजा : बेचाळीसवी राष्ट्रीय ज्युनियर क्युरोगी व ११ वी पूमसे तायक्वॉंदो चॅम्पियनशिप स्पर्धा कोरमंगला इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू (कर्नाटक) येथे ३१ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी तालुक्यातील तायक्वॉंदो खेळाच्या राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.तेजस्विनी या मंदरुळ गावच्या कन्या असून त्या सध्या लांजा तालुका येथे वास्तव्यास आहेत. त्या तायक्वॉंदो खेळाच्या प्रमुख प्रशिक्षिका आहेत. त्यांनी लांजा तालुक्यातील विविध ग्रामीण भागात, तसेच लांजा शहरातील गोंडे सखल रोड चॉकलेट ड्रॉप, एकनाथ राणे स्कूल, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, सेंटआणे विद्यानिकेतन स्कूल देवधे या सर्व शाळांमध्ये तायक्वॉंदो खेळाचे तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाअंतर्गत सुमारे चारशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. तसेच त्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिद्धा प्रशिक्षिका ही आहेत.त्या अंतर्गत त्या नेहमी महिला व मुलींना स्वतःचे स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देत असतात. तसेच त्यांनी स्वतः जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. याआधी त्यांना सामाजिक शेत्रात व क्रीडा शेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र lव रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड केली आली आहे.तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, सेक्रेटरी मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, उपाध्यक्ष धुळीचंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, लांजा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिराज नेवरेकर, तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सहसचिव अनुजा कांबळे, कोषाध्यक्ष तेजस पावसकर, सदस्य रोहित कांबळे, लांजा नगरपंचायत नगर सेवक संजय यादव, कोर्ले ग्रामपंचायत सरपंच गणेश साळुंके, ग्रामसेवक तेजस वडवलकर, मंदरुळ गावचे गावप्रमुख परशुराम मासये व समस्त लांजा-राजापूरवासियांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




