
खेड लोटे येथील भगवान कोकरे यांच्या गुरुकुलमध्ये चालले आहे तरी काय? विनयभंग प्रकरण ताजे असतानाच आता विद्यार्थ्यांबरोबर रॅगिंग चा प्रकार उघड
खेड लोटे येथील भगवान कोकरे यांच्या गुरुकुलमध्ये चालले आहे तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे गुरुकुल मध्ये गुन्ह्याचा नवा प्रकार घडल्याचे तक्रार दाखल झाली आहे गुरुकुल मध्ये राहणाऱ्या मुलीचे विनयभंग प्रकरण ताजे असतानाच आता गुरुकुलच्या मॉनिटर अल्पवयीन मुलाने अल्पवयीन विद्यार्थ्यांबरोबर रॅगिंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे
खेड लोटे येथील
भगवान कोकरे महाराज याच्या गुरुकुलातील विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार केल्यानंतर महाराज व त्यांच्या साथीदारांना अटक झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मॉनिटरने अन्य विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल या अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या शाळेतील वर्गाचा मॉनिटर असलेल्या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरुन खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुरुकुलच्या हॉलमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांचे अश्लील फोटो काढून कुणालाही काही सांगायचे नाही, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे
वर्गाचा हा मॉनिटर इतर विद्यार्थ्यांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे. तसेच गुरुकुलातील काही विद्यार्थ्यांना काही पदार्थांचे व्यसन करण्यास देखील हा भाग पाडत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याच्या पालकांनी ही तक्रार दिल्यानंतर त्या अल्पवयीन मॉनिटरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून या गुरुकुलाचा प्रमुख कोकरे महाराज याच्यावर विद्यार्थिनींच्या विनयभंगा प्रकरणी पॉस्को अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाले असतानाच पुन्हा हा रॅगिंगसारखा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.




