
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन ,साश्रू नयनाने लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप
भारतीय चित्रपटसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी गोव्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कला, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली.
निधनानंतर नानांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी पुण्याजवळील त्यांच्या डोणजे गावातील नानाचीवाडी या घरी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अंतिम इच्छेनुसार शेजारीच असलेल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय नेते, कला-सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज आणि हजारोंच्या संख्येने चाहत्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार भीमराव तापकीर, रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी अंत्यदर्शन घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळ येथे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते, तंत्रज्ञ, नाम फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि हजारो ग्रामस्थ या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.नाना पाटेकर यांची आपल्या ”नानाची वाडी” या डोणजे गावातील घराशेजारील शेतातच अंतिम संस्कार व्हावेत अशी तीव्र इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा आणि भावनेचा आदर करत नाम फाऊंडेशन, स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांच्या शेतातच अंतिम संस्काराची सर्व तयारी करण्यात आली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास जेव्हा त्यांचे पार्थिव शेतात आणण्यात आले, पोलिसांनी बिगुल वाजवून आणि हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.



