संतोष पंडित यांना पुन्हा कोर्टात केलं हजर, आता कारागृहात होणार रवानगी!

पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अटकेत असलेले रीलस्टार संतोष पंडित यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. आता संतोष पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता संतोष पंडित यांची रवानगी कारागृहात होणार आहे.

भाजपचे नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे मध्यरात्री पुणे पोलिसानी संतोष पंडित यांना अटक केली होती. पंडित यांच्या अटकेमुळे सर्वत्र टीका होत होती. आज मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर पुणे पोलिसांनी संतोष पंडित यांना न्यायालयात हजर केलं होतं.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपातून संतोष पंडित यांच्यावर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तपासासाठी न्यायालयाने यापूर्वी ८ सप्टेंबरपर्यंत पंडित यांना पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पंडित यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता त्यांची रवानगी कारागृहात होणार आहे. पंडित यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील व्हिडिओ आणि संबंधित आक्षेपार्ह मजकुराचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button