एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी तीन जानेवारी २०२७ ला राज्यभरातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे.याबाबतचे अधिकृत शुद्धीपत्रक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सरकारच्या विविध विभागांतील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते.

यापूर्वी आयोगाने १६ जुलैला प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ही परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता या तारखेत बदल केला आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि परीक्षार्थींना वेळेत व सुरक्षितपणे केंद्रावर पोहोचता येणे या प्रशासकीय बाबींचा आयोगाने सर्वंकष आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button