
रॅलीस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपल अंजली पवार मॅडम यांची राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी!
रत्नागिरी : रॅलीस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, वाटूळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरीच्या प्रिन्सिपल अंजली पवार मॅडम यांनी ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्लिंग शॉट (Slingshot) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal ) पटकावले.
देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत अंजली पवार मॅडम यांनी आपल्या अचूक नेमबाजीचे आणि उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत हे मानाचे यश संपादन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे रॅलीस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, वाटूळ तसेच राजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी सांभाळतानाच क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या अंजली पवार मॅडम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल रॅलीस फाउंडेशन, रॅलीस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच हितचिंतकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🌟 “शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी!”
अंजली पवार मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन ! 💐🥈




