
जैतापुरचा राजा मंडळ आपल्या सक्रिय सदस्यासहित काही गरीबाना विमा कवच देणार, मंडळ दरवर्षी प्रीमियम भरणार
सध्या आपल्या कार्याचा जबरदस्त बोलबाला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतितयश जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या सक्रिय सदस्या सहित मोलमजूरी करणाऱ्या काही गोरगरीबाना सुरक्षा विमा कवच देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जैतापुर पोस्ट ऑफिस चे कर्मचारी ओमकार माजरेकर यांच्या कडून याबाबत माहिती घेण्यात आली. त्यांनी अनेक स्कीमची माहिती दिली.लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करुण कमीतकमी 5लाखाचा प्रति सदस्य पूर्ण ग्रुप करुण हा विमा काढण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे.
सर्व सदस्यानी आपली सक्रिय सदस्य नोंदनी लवकरात लवकर खजिनदार सुनिल करगुटकर यांच्याकड़े करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर यांनी केले आहे.



