अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर; समाज कल्याण विभागाचे अर्ज करण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. २७ ) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयं सहाय्यता बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्यावतीने मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.

  • योजनेचे स्वरूप व अनुदान:
  • बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्ती (HP) क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर, कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर आणि ट्रेलर यांसारखी उपसाधने उपलब्ध करून दिली जातील.
  • मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांच्या खरेदीसाठी कमाल मर्यादा ३.५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
  • यापैकी बचत गटाने १० टक्के स्वहिस्सा भरणे आवश्यक असून, उर्वरित ९० टक्के (कमाल ३.१५ लाख रुपये) रक्कम शासन अनुदानाच्या स्वरूपात देईल. हे अर्थसहाय्य थेट बचत गटाच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
  • पात्रतेचे निकष:
  • स्वयं सहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असणे बंधनकारक आहे.
  • गटाचे अध्यक्ष आणि सचिव याच प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.
  • अर्ज कुठे व कसा करावा?
  • पात्र व इच्छुक बचत गटांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबाव, रत्नागिरी येथे सादर करावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button