
आंजर्ले तरीबंदर येथे भीषण आग; दोन ते तीन मासेमारीच्या बोटी जळून खाक
दापोली : आंजर्ले तरीबंदर येथे मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. तरीपलीकडे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या मासेमारीच्या बोटींना आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या आगीत दोन ते तीन बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.




