
48 तास राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळणार
48 तास राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाऊस पडून गेल्यावर गारवा जाणवण्याऐवजी उष्णता जास्त वाढत आहे. ऊन पावसाचा हा खेळ कधी थांबणार आणि मान्सूनचा पाऊस कधी येणार याची वाट शेतकरीच नाही तर सर्वसामान्य माणूस देखील पाहात आहे.
नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि मालेगाव परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर परिसरातही ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात पावसाचा जोर चांगला असेल, तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील.




