
हवामानात उलटफेर, येत्या काहीच तासांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
राज्यातील हवामानात मोठा उलटफेर जाणवू लागला आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय राहणार असल्याची शक्यता आहे. जून महिना संपत आला मात्र तरीही मान्सूनचा पत्ता नाही. राज्यात मान्सून सक्रिय राहणं अपेक्षित असून यंदा मान्सूनला हजेरी लावण्यास विलंब झाला आहे.कोकण विभागात मोठा बदल जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईसह काही ठिकाणी रविवारी पावसाने जोडपलं होतं, आता पुढाली काही दिवस मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह तुरळक पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.




