संगमेश्‍वर आगारात उभ्या असलेल्या एसटी बसच्या बॅटरीचा भीषण स्फोट; प्रवाशाचा उडाला थरकाप


संगमेश्वर तालुक्यात एस.टी. महामंडळाचा भोंगळ कारभार आणि बसेसच्या देखभालीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष पुन्हा एकदा प्रवाशांच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री संगमेश्वर एस्.टी. आगार आवारात घडली. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर स्टँड आवारात उभ्या असलेल्या देवरुख आगाराच्या देवडे – बोरिवली बसच्या बॅटरीचा अचानक भीषण स्फोट झाला. या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाने संपूर्ण आगार परिसर हादरला आणि प्रवाशांमध्ये एकच पळापळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास संगमेश्वर आगार परिसर प्रवाशांनी खचाखच भरलेला होता. याच दरम्यान देवरुख आगाराची एम.एच. १४ एल.एक्स. ७१४२ ही देवडे – बोरिवली जाणारी बस आगारात उभी होती. अचानक या बसमधून अत्यंत मोठा आवाज झाला. आवाज इतका भयानक होता की, बॉम्बस्फोट की काय? या भीतीने प्रवाशांची गाळण उडाली आवाज नेमका कशाचा झाला, हे सुरुवातीला कोणालाच समजत नव्हते. मात्र, त्याच वेळी बसमधील प्रवाशांनी भयभीत होऊन बाहेर पडू लागले, तेव्हा बाहेर असलेल्या लोकांचे लक्ष बसच्या बॅटरी कक्षाकडे गेले. त्या कक्षातून मोठ्या प्रमाणावर धूर आणि कसले तरी रासायनिक पाणी बाहेर येत असल्याचे दिसून आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button