
राजापूर तालुक्यातील १११ शाळांना गळती, विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार पावसात शिक्षण
राजापूर तालुक्यातील १११ शाळांच्या इमारतींचे छप्पर नादुरूस्त झालेले असून त्यापैकी १५ शाळांच्या इमारती धोकादायक असून त्यांच्या दुरूस्तीसह अन्य २४ शाळांच्या इमारतींची देखील पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती होणे गरजेचे आहे. विधान परिषद निवडणूकीची आचारसंहिता आणि तांत्रिक बाबींमध्ये शाळा दुरूस्तीचा निधी मंजूरी अडकली असली तरी, या वर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इमारतींची छप्पर दुरुस्ती न झाल्यास या शाळांमधील मुलांना छप्परातून पावसाच्या ठिबकणार्या पाण्याखाली बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत.
www.konkantoday.com



