युवासेनेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी तुषार साळवी


रत्नागिरी : युवासेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख तुषार साळवी यांची शिवसेना पक्षाच्या युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. युवासेनेचे सचिव विकास भरतशेठ गोगावले यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती करण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी काही महत्वपूर्ण संघटनात्मक बदल करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार रत्नागिरीच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय साळवी यांनी ही संधी दिली गेली आहे. युवासेनेचे वरिष्ठ नेते पूर्वेशभाई सरनाईक यांच्या आदेशानुसार विकास गोगावले यांनी साळवी यांच्याकडे नियुक्तीपत्र सुपूर्द केले. शिवसेना एकत्र असल्यापासून म्हणजेच २०१४ पासून साळवी यांनी रत्नागिरी तालुक्याचे युवक प्रमुख पद जबाबदारीने सांभाळले होते. शिवसेना दुभंगल्यानंतरही त्यांनी पालकमंत्री सामंत यांची साथ सोडली नव्हती. सामंत यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी आणि राजकीय काम तडीस नेण्यात साळवी यांची भूमिका महत्वाची होती. गेल्या बारा वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यामध्ये युवकांची मजबूत संघटन बांधणी करत साळवी यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक लक्षवेधी उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी महारक्तदान शिबिराचे आयोजन ते करत आहेत. युवकांच्या मदतीने त्यांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचेही आयोजन केले आहे. मुन्ना देसाई यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. त्या जागेवर साळवी यांची नियुक्ती केली आहे.
“पालकमंत्री उदय सामंत यांनी या पदासाठी योग्य समजून ही जबाबदारी दिली आहे. वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जिल्ह्याच्या दक्षिण भागात संघटना वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहीन.”

  • तुषार साळवी, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख, रत्नागिरी दक्षिण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button