युवासेना रत्नागिरी शहरातर्फे भव्य शहरस्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन


‘शिवरायांचा इतिहास जपूया, युवा कलागुणांना वाव देऊया’; स्पर्धेत सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन


रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याच्या गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच तरुणांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने युवासेना रत्नागिरी शहराच्या वतीने भव्य शहरस्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. उदय रवींद्र सामंत आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘शिवरायांचा इतिहास जपूया, युवा कलागुणांना वाव देऊया’ हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील युवक, मंडळे आणि नागरिकांना गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची संधी मिळणार आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांची रचना, त्यांचे महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या स्पर्धेसाठी ५ ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नोंदणी करता येणार असून, १२ ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान प्रत्यक्ष परीक्षण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ रत्नागिरी शहरापुरती मर्यादित असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
रत्नागिरी शहरातील जास्तीत जास्त युवकांनी, मंडळांनी आणि नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा जपण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक युवासेना रत्नागिरी शहराच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
७३०४२६२९०४
७०३८२२८८८५

आयोजक : युवासेना उपशहर प्रमुख सर्वेश शेलार, रोहित मायनाक

प्रवेश विनामूल्य | आकर्षक रोख पारितोषिके

सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या किल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button