
पायरी/ हापूस आंब्याची झाडे कराराने देणे ; २३ पर्यंत दरपत्रक द्यावीत
रत्नागिरी, दि. १५ ) :-. माजी सैनिक विश्रामगृह येथील आवारामधील पायरी – १ व हापूस – ५ अशी सहा आंब्यांची झाडे आंबे उत्पादनासाठी ३ वर्षासाठी एकत्रित रक्कत घेऊन कराराने देण्याचे आहे. तरी इच्छुकांनी आपले दरपत्रक बंद लिफाफ्यामध्ये घालून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांच्याकडे दि.२३ जून २०२६ पर्यंत सादर करावीत.




