
पर्यटनासाठी गणपतीपुळेत आलेल्या जळगावच्या पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू
गणपतीपुळेत पर्यटनासाठी आलेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्य झाला. ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. बंडू रामा जाधव (६४, रा. चाळीसगाव, जि. जळगांव) असे मृताचे नाव आहे. बंडू जाधव हे १२ जून रोजी आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी गणपतीपुळेत आले होते.
नेवरे उंबरवाडी येथील होमस्टे येथे ते वास्तव्यासाठी थांबले होते. १३ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बंडू यांना अत्यवस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे नेते. तसेच पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी बंडू यांना तपासून मृत घोषीत केले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




