
कडवई गावाने इतिहास संवर्धनाच्या क्षेत्रात एक वेगळा मानाचा टप्पा गाठला
संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई या छोट्याशा गावाने इतिहास संवर्धनाच्या क्षेत्रात एक वेगळा मानाचा टप्पा गाठला आहे. गावातील विविध ठिकाणी वर्षानुवर्षे विखुरलेल्या ५५ सतीशिळा एकत्रित करून कोकणातील पहिले सतीशिळा स्मारक उभारण्यात आले असून, १८ मे रोजी जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून या स्मारकाचे उदघाटन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशात सतीशिळा, वीरगळ आणि गद्धेगळ यांना विशेष महत्व आहे. मात्र दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणच्या सतीशिळा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत गेली १५ वर्षे दुर्गवीर प्रतिष्ठानसोबत कार्यरत असलेले इतिहासप्रेमी अजित राणे यांनी स्वतःच्या कडवई गावातील विखुरलेल्या सतीशिळांचे जतन करण्याचा संकल्प केला.
www.konkantoday.com




