
संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसराला गडगडटा सह वाऱ्या पावसाने जोरदार झोडपले
संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसराला ढगांच्या गडगडटा सह वाऱ्या पावसाने जोरदार झोडपले यामुळे आंबा काजूचे फार मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस अचानक आल्याने शेतकऱ्यांची फार मोठी धांदल उडाली. देवळे येथील मठाजवळ झाड पडल्याने देवरुख चाफवली एस.टी. देवळेतून मागे गेली. देवळीत रस्त्यावर पाणीच पाणी झालं.
देवळे महावितरण लाईनवर झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. देवळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. वादळे वाऱ्यामुळे काही ठिकाणी मंडप प पडले तर काही ठिकाणी छप्परावरील उडाले.
देवळे चाफवली परिसरात आंबा पीक मे महिन्यात जोरदार येत असते काजूही असाच असतो त्यामुळे आंबा काजूचे वादळी वाऱ्यामुळे फार मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदार झाला आहे.मार्च एप्रिल महिन्यात पडलेल्या पावसाच्या तुलनेने आज पडलेला पाऊस वारा फार मोठा असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला आंबा वाऱ्याने पडला तर उरलेला झाडावर असलेला आंबा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.



