संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे येथेरिक्षा दरीत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली


संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे येथे रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे रिक्षा घसरून थेट दरीत कोसळली. मात्र, रिक्षाचालक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उड्या मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात बुधवारी मध्यरात्री घडला.

मिळालेल्या माहितीनुसार उजगाव येथील रिक्षाचालक कानसरे हे बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जात होते. माभळे परिसरात रस्ता निसरडा झाल्यामुळे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा खोल दरीत कोसळली. काळोख असतानाही प्रसंगावधान राखल्यामुळे या अपघातातून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे ते सडा या रस्त्याच्या काँक्रिटी करणाचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य सौ.माधवी गीते यांच्या पाठपुराव्यातून आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने हे काम मंजूर झाले आहे. मात्र कामाच्या नियोजनाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ठेकेदाराने रस्त्यासाठी केलेले माती उत्खनन पहिल्याच पावसात रस्त्यावर वाहून आल्याने संपूर्ण मार्ग धोकादायक बनला आहे.

ग्रामस्थांनी वारंवार सूचना दिल्यानंतर केवळ नावापुरते गटार काढण्याचे काम सुरू केले गेले मात्र रस्ता सुरक्षित करण्यात ठेकेदार अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.

पहिल्याच पावसात माती वाहून गेल्याने सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे.या अपघातानंतर ग्रामस्थांमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button