
विशेष लोक अदालत 18 जुलै व 21
रत्नागिरी, दि. 8 ) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीतर्फे १८ जुलै २०२६ व २१ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या लोक अदालतचा लाभ घ्यावा. मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही वाय. जाधव यांनी केले आहे.
पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्याकरीता आपले वकील, संबंधीत न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.
लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.




