
राजापुरातील ओणी, पाचल, अणुस्कुरा रस्त्याचे रूपडं पालटणार -आ. किरण सामंत
गेल्या काही वर्षांत राजापूर तालुक्यातील ओणी, पाचल, अणुस्कुरा मार्गाला दळणवळणाच्या साधनेत अनन्यसाधारण महत्व प्राप्त आले आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून वाहन चालक, पर्यटक या मार्गाला पसंती देत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढलेली आहे. याचा विचार करता भविष्यात या मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण करण्यासाठी ३८०.७२ कोटी रूपये खर्चाचा विशेष आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली.
हातिवले जैतापूर व वाटूळ दाभोळ या नूतनीकरण झालेल्या रस्त्यांच्या धर्तीवरच ओणी, पाचल, अणुस्कुरा मार्ग अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी केंद्र व राज्ज शासनाच्या सहयोगात एशिएन डेव्हपर्सद बँक अथवा हायब्रीड ऍन्युटी या संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या रस्ताचे काम मार्गी लावले जाणार असल्याचेही आ सामंत यांनी सांगितले.www.konkantoday.com




