रत्नागिरी शहरातील विश्वनगर-मारुतीमंदिरयेथील प्रौढाची ५५ हजारांची ऑनलाइन फसवणूक


रत्नागिरी :शहरातील विश्वनगर-मारुतीमंदिर येथील प्रौढाची ५५ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ एप्रिल २०२६ ला सकाळी सातच्या सुमारास स्वामी बंगला, विश्वनगर, मारुती मंदिर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजेश सखाराम आंबेकर (वय ४५, रा. आंबेड ता. संगमेश्वर, सध्या – स्वामी बंगला विश्वनगर, मारुती मंदिर, रत्नागिरी) यांच्या बॅंक ऑफ इंडिया शाखा कुरधुंडा (ता. संगमेश्वर) बॅंकेच्या खात्यातून अज्ञाताने मोबाईलच्या तांत्रिक बाबीचा वापर करून ५५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी राजेश आंबेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button