रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ’तळवडे’ या गावाची ’मधाचे गाव’ म्हणून निवड


राज्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मुबलक फुलोरा असलेल्या क्षेत्रांमध्ये मधमाशा संवर्धनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, धुळे जिल्ह्यातील ’रामी’ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ’तळवडे’ या दोन गावांची ’मधाचे गाव’ योजनेसाठी निवड झाली आहे. या निर्णयामुळे मध उद्योगाला मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या दोन्ही गावांसाठी सरकारने एकूण १ कोटी ४ लाख १० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button