युद्धाचं सावट पुन्हा गडद झालं; अमेरिकेनं इराणचा प्रस्ताव फेटाळला, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा अटळ?

Trump Rejects Iran Peace Deal : अमेरिका – इस्रायल – इराणदरम्यान दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावाला इराणने मध्यस्थीची भूमिका बजावत असलेल्या पाकिस्तानकडे उत्तर पाठविले आहे.

इराणच्या ‘आयआरएनए’ वृत्तसंस्थेने रविवारी ही माहिती दिली. मात्र, हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अस्वीकार्य आहे. याबाबत त्यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. दरम्यान, पश्चिम आशियाती हा संघर्ष असाच सुरू राहिल्यास जगभरातील इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच (१० मे) देशातील जनतेला इंधन बचत करण्याचे आवाहन केले आहे.

‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले की, तेहरानच्या प्रतिनिधींनी पाठवलेल्या संदेशाचा त्यांनी आढावा घेतला आहे, परंतु ते यामुळे प्रभावित झालेले नाहीत. प्रतिसादातील तपशीलांचा उल्लेख न करता त्यांनी लिहिले, “मला हे आवडलेले नाही.”

वॉशिंग्टन आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न गेल्या काही आठवड्यांपासून मंदावले आहेत, तरीही पर्शियन गल्फमध्ये दोन्ही बाजूंनी लष्करी चकमकी सुरूच आहेत. तात्पुरती युद्धबंदी जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटला असला तरीही हा तणाव कायम आहे. ही युद्धबंदी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्यासाठी करण्यात आली होती. इराणने या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक रोखणे सुरूच ठेवल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. ही सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर केलेली पोस्ट
अमेरिकन अधिकार्‍यांच्या मते, त्यांच्या मुख्य मागण्या बदललेल्या नाहीत, ज्यामध्ये मुक्त सागरी वाहतूक पूर्ववत करणे आणि इराणच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेला आळा घालणे यांचा समावेश आहे. ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, वॉशिंग्टन तेहरानकडून स्पष्ट तोडग्याची वाट पाहत आहे. ते म्हणाले, “जेव्हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक सुरळीत सुरू होईल, तेव्हा ऊर्जेच्या किमती कमी होतील.” दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत माईक वॉल्ट्झ यांनी मान्य केले की, वाटाघाटी अपेक्षेपेक्षा “दीर्घ आणि संथ” चालल्या आहेत, परंतु मुत्सद्दी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

लष्करी दबाव कायम

अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीला लक्ष्य करणारी नौदलाची नाकेबंदी कायम ठेवली आहे, जी इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. गुप्तचर मूल्यमापनानुसार, इराणची व्यवस्था तातडीने कोलमडून न पडता असा दबाव अनेक महिने सहन करू शकते. एका वेगळ्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आग्रह धरला की हा संघर्ष संपण्यापासून अजून लांब आहे. ते म्हणाले, “जर मला सर्वोत्तम करार करता येत नसेल, तर मला तिथे पोहोचण्यात रस नाही. आपण (कराराच्या) बऱ्यापैकी जवळ आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button