
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दुचाकीवर स्वार होऊन विधानभवनात हजेरी लावली
पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर ताण निर्माण झाला आहे आणि त्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आणि शासनयंत्रणेला इंधन बचतीचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरही वाहन-ताफ्यांमध्ये कपात सुरू आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारनेही मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आणि आज गुरुवार, १४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दुचाकीवर स्वार होऊन विधानभवनात हजेरी लावले. त्यांच्यासह मंत्री आशिष शेलार आणि त्यांचे सुरक्षक रक्षकही दुचाकीवरून आले होते. (महाराष्ट्र सरकारने सरकारी खर्चात बचत करण्यासाठी मंत्र्यांना सार्वजनिक वाहतूक म्हणजेच, मेट्रो, बस इत्यादी वापरण्याचे सुचवले आहे आणि अनावश्यक परदेश दौऱ्यांवर निर्बंध लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे दिवसेंदिवस प्रशासनाने दैनंदिन प्रवास खर्च आणि इंधन वापर कमी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.




