
मुंबई-गोवा महामार्गावरील उधळेनजीक ट्रकला कारची धडक बसून महिला जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील उधळेनजीक गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सीएनजी वाहतूक करणार्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघात कारमधील पूजा सुमित गांगुर्डे (२३ रा. नाशिक-सिन्नर) ही महिला जखमी झाली. यानंतर कारचालकाने केलेल्या मारहाणीत शैलेश गुरव (३६ रा. संगमेश्वर) हा ट्रक चालकही जखमी झाला.
सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी रातोरात घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल कैले. ट्रक चालक मुंबईच्या दिशेने जात होता. याचवेळी गणपतीपुळे येथून कारचालक नाशिकला जात असताना समोरून धावणार्या टकला पाठीमागून धडक दिली. अपघातात ट्रकवेही नुकसान झाले आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतूकही खोळंबली. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.www.konkantoday.com




