
भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी विभागाने स्पीड पोस्ट आणि पार्सल बुकिंग व्यवसायात उल्लेखनीय यश
भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी विभागाने स्पीड पोस्ट आणि पार्सल बुकिंग व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले असून या यंशाचे प्रमुख मानकरी विनायक लिंगायत ठरले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे रत्नागिरी टपाल विभागात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. ९ मे २०२६ रोजी डी. एस. कुलकर्णी यांनी रत्नागिरी प्रधान डाकघरातील सर्व पोस्टमन कर्मचार्यांना स्पीड पोस्ट आणि पार्सल बुकिंग व्यवसाय वाढीसाठी सक्रिय प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला रत्नागिरीच्या टपाल कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोहिमेमध्ये विनायक लिंगायत यांनी विशेष पुढाकार घेत थेट ग्राहक संपर्कावर भर दिला. त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून त्यांनी आपल्या बीटमधील प्रमुख ग्राहक थरवल यांच्याकडून तब्बल ७० स्पीड पोस्ट आणि पार्सल बुकिंग मिळवले. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळवणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब मानली जात आहे.
ग्राहक संपर्क, तत्पर सेवा आणि वेळेत काम पूर्ण करण्याची बांधिलकी यामुळे रत्नागिरी टपाल विभागाची विश्वासार्हता अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. ’जास्त बुकिंग जास्त यश हा मंत्र आत्मसात करत केलेल्या या कामगिरीबद्दल विनायक निगायत यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com



