
दूध आणण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणाचा मृतदेह कारमध्ये आढळला.
खेड तालुक्यातील बोरज-आग्रेवाडी येथील अरविंद रामचंद्र चिनकटे या ४५ वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कारमध्ये आढळला. याबाबत आशा रामचंद्र चिनकटे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांचा मुलगा अरविंद हा मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कारने (एमएच १२ व्हीटी ०२८६) दूध आणण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने गावातील दोघेजण शोध घेण्यासाठी बाहेर पडले. याचदरम्यान सायंकाळी अरविंद कारमध्येच डॅश बोर्डवर डोके ठेवून झोपलेल्या अवस्थेत आढळले. कारमधून त्यांना बाहेर काढून तोंडावर पाणी मारत उठवण्याचा प्रयत्न केला असता काहीही प्रतिसाद दिला नाही. उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले.
www.konkantoday.com




