दापोली शहरात सीएनजीचा तुटवडा, पर्यटकांसह रिक्षाचालक व वाहनचालक हैराण


कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या दापोली शहरात सध्या सीएनजीच्या तीव्र टंचाईमुळे रिक्षा व्यावसायिक आणि वाहनधारक हवालदिल झाले आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे बहुतांश रिक्षा आणि खासगी वाहने आता सीएनजीसाठी धावत आहेत. मात्र, दापोली परिसरात केवळ दोनच पेट्रोल पंपांवर सीएनजी उपलब्ध असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने दापोलीत पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे रिक्षा व्यवसायाला सुगीचे दिवस आले असतानाच, इंधनाच्या टंचाईने या उत्साहावर विरजण घातले आहे. सीएनजी भरण्यासाठी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, चालकांना आपला नंबर येण्यासाठी तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे व्यवसायाची वेळ वाया जात असून प्रवाशांनाही ताटकळत राहावे लागत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button