डायल ११२’ मध्ये रत्नागिरी राज्यात सातव्या स्थानावर


रत्नागिरी : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणार्‍या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ’डायल ११२’ या सेवा प्रणालीने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामगिरीचा डंका वाजवला आहे. घटनास्थळी पोहोचण्याच्या वेळेत (रिस्पॉन्स टाईम) कमालीची सुधारणा करत रत्नागिरी पोलिसांनी थेट २५ अंकांची मोठी झेप घेतली आहे. राज्यामध्ये ३२ व्या क्रमांकावरून थेट ७ व्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या या वेगवान आणि तत्पर सेवेमुळे पहिल्या १० उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीने मानाचे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षभरात आणि चालू वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत पोलिसांनी केलेल्या कामगिरीची आकडेवारी पाहता हा बदल अत्यंत कौतुकास्पद ठरला आहे. वर्ष २०२५ ची स्थिती पाहता जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात रत्नागिरी पोलिसांना एकूण ७,४०० ल्स आले होते. त्यावेळी पोलिसांचा कॉ सरासरी प्रतिसाद वेळ ८ मिनिटे ४५ सेकंद इतका होता आणि जिल्हा राज्यात ३२ व्या क्रमांकावर होता.
पाच महिन्यात ९२१ कॉल्स मात्र वर्ष २०२६ मध्ये मोठी झेप घेतली आहे. जानेवारी ते मे २०२६ या चालू वर्षाच्या अवघ्या पाच महिन्यांत पोलिसांना ९२१ कॉ ल्स प्राप्त झाले. योग्य नियोजन आणि चपळतेमुळे पोलिसांनी हा प्रतिसाद वेळ अवघ्या ६ मिनिटे ३४ सेकंदांवर आणला. याच कामगिरीच्या जोरावर जिल्ह्याने थेट ७ व्या क्रमांकावर झेप घेतली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button