
चिपळुणात होणार पोस्टाचे विभागीय कार्यालय, कारभार अधिक गतीमान होणार
चिपळूण येथील टपाल कार्यालयाच्या वरील मजल्यावर जून महिन्यापासून विभागीय कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे उपविभागांचा कारभार आणखी गतिमान होणार असून काही तालुक्यांमधील ग्राहकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी रत्नागिरीत जाण्याचा ताप वाचणार आहे.
सर्वत्र विविध बँका, पतसंस्था यांचा विस्तार वाढत असला तरी आजही ग्राहकांचा पोस्ट कार्यालयावरील विश्वास कायम असून ग्राहकांची संख्या कायम वाढताना दिसत आहे. या कार्यालयाकडून आपल्या सुविधांचा तितकासा प्रचार आणि प्रसार होताना दिसत नसला तरीही ग्राहक त्याची माहिती घेण्यासाठी कार्यालयांमध्ये येताना दिसतात. शहरातील नगर परिषदेसमोर पोस्टाचे मुख्य कार्यालय आहे. येथे दर दिवशी हजारो ग्राहक येतात. त्यांना अनेक कर्मचार्यांच्या उद्धट वागण्याचा त्रास सहन करावा लागतो.
www.konkantoday.com




