सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खेड येथे उभारण्यात आलेले शासकीय विश्रामगृह सध्या कागदावरच


सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खेड येथे उभारण्यात आलेले शासकीय विश्रामगृह सध्या कागदावरच असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल २ कोटी ८० लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नसून, आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यामुळे उर्वरित कांम रखडले आहे.
सध्या या विश्रामगृहाच्या तळमजल्यावरील चार सूट्सचे काम पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांसाठी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे केअरटेकर, चौकीदार आणि खानसामा या महत्त्वाच्या पदांची
रिक्तता होय. कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृहाचे व्यवस्थापन करणे शक्य नसून, त्यामुळेच ऑनलाइन बुकिंग सेवा देखील अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, शासनाने मोठा खर्च करून उभारलेली ही सुविधा वापराविना पडून आहे.
स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत असून, हंगामी तत्वावर कर्मचारी उपलब्ध करून देत विश्रामगृह तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, संबंधित विभागाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून उर्वरित काम पूर्ण करावे व आवश्यक कर्मचारी नियुक्त करून विश्रामगृह सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button