
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व विरोधी पक्षांच्या एकजूटी राजू शेट्टी घेणार उद्धव ठाकरेंची भेट!____
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, अद्यापही सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज दुपारी १ वाजता मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.




