राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांचा राजीनामा

रत्नागिरी : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष संकेत सुरेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिखरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
संकेत कदम हे २०११ पासून पक्षात सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून, २०२२ पासून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. या कालावधीत त्यांनी संघटना बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले होते.
मात्र आता वैयक्तिक कारण पुढे करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे पाठविला आहे.
दरम्यान, संकेत कदम यांच्या राजीनाम्यामागे काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असून, ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button