
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या भरती न झाल्यास एक हजार नागरिकांन मागे एक पोलिस
झाल्याने एक हजार नागरिकांमागे एक पोलीस
रत्नागिरी जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार्या रत्नागिरी पोलीस दलातील मंजूर पदांची संख्या गेल्या ४६ वर्षांपासून वाढलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्याचा भौगोलिक आणि सामाजिक विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असतानाही पोलीस दलातील मंजूर पदे १९८० पासून आजतागायत १ हजार ५७४ एवढीच कायम आहेत. सध्या जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाखांच्या पुढे गेली असून, साधारण १ हजार लोकांमागे एक पोलीस अशी स्थिती आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांवर प्रचंड कामाचा ताण निर्माण झाला आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात नव्याने पदनिर्मिती करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूप बदलले आहे. वाढत्या दळणवळणामुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे गुन्हेही जिल्ह्यापर्यंत पोहोचू लागले आहेत. अशा परिस्थितीत मर्यादित मनुष्यबळ असूनही पोलिस दल गुन्हे उघडकीस
आणण्यात समाधानकारक कामगिरी करत आहे.
मात्र, कमी मनुष्यबळ ही पोलीस दलासमोरील मोठी समस्या बनली आहे. कायदा व सुव्यवस्था राखताना, गुन्ह्यांचा तपास करताना, तसेच २४ तास गस्त, बंदोबस्त आणि विविध जबाबदार्या पार पाडताना पोलिसांची दमछाक होत आहे.
www.konkantoday.com



