
बिग बॉस मराठी पर्व ६ ची महाविजेती तन्वी कोलते हिचे कोंडगाव मध्ये जोरदार स्वागत
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव – साखरप्याची रहिवासी व बिग बॉस मराठी पर्व ६ ची महाविजेती तन्वी उदय कोलते हिचे कोंडगाव मध्ये भव्य स्वागत करण्यात आले. तन्वी कोलते हिच्या विजयाच्या समर्थ कोंडगाव बाजारपेठेतून भव्य स्वागत रॅली काढण्यात आली.
डीजे चे संगीत, फटाक्यांची आतषबाजी चाहत्यांची गर्दी, तन्वीचे कुटुंब यामध्ये सामील होते. यावेळी कोंडगावमध्ये अभूतपूर्व उत्साह व ठीक ठिकाणी तन्वीचे स्वागत हा सर्व सोहळा अद्वितीय होता.
अनेक महिलांनी ओवाळणी औक्षण व पेढा भरवून तिला शुभेच्छा दिल्या. बिग बॉस मधील मिळालेले यश कोंडगाव, साखरपा आणि जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचे नाव यशाच्या शिखरावर नेलेल्या तन्वीचे अनेकांनी तिच्या कार्यकतृवाला मोठ्या मनाने सलाम केला.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, भडकंब्याचे माजी सरपंच बापू शिंदे बहुसंख्य महिला व तरुणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




