
जि.प.कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेत “एकच ध्यास, करु ध्यास ! ” उपक्रम

रत्नागिरी तालुक्यातील जि.प.कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “एकच ध्यास ,करु अभ्यास !” उपक्रम संपन्न झाला.
यावेळी दि.११एप्रिल २०२६ रोजी सकाळी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेची जयघोषात मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.”एकच ध्यास करु अभ्यास !” या उपक्रमाची प्रस्तावना करण्यात आली.अक्षरगंगा प्रज्ञाशोध परिक्षेत गुणवत्ता आलेल्या सिद्धी विनोद राणे व कुणाल आशिष शिंदे
या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर महात्मा यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थी व शिक्षकांनी भाषणे केली.त्यानंतर दुपारनंतरच्या सत्रात शिरगांव
तिवंडेवाडीचे उपक्रमशिल शिक्षक श्री.रफिक मुलाणी यांनी इ.३री व ४थीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी पालकवर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
त्यानंतर १२ एप्रिल २०२६ रोजी भाईशा घोसाळकर हायस्कूल कडकवई (ता.संगमेश्वर) चे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री.मिलिंद कडवईकर सरांनी शिक्षण व करिअर मार्गदर्शन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिक्षणाने माणूस शहाणा व श्रीमंत होतो.हे त्यांनी अनेक उदाहरणे दाखले देवून विद्यार्थी व ग्रामस्थांना पटवून दिले.यावेळी त्यांनी करिअर निवडताना मार्ग चुकला तर काम करताना जो आनंद आपल्याला मिळतो.तो मिळत नाही परिणामी हळहळ,नैराश्य व दुःख निर्माण होते.त्यासाठी आपल्या आवडी निवडी जोपासत आपल्या आवडत्या विषयाचे शिक्षण घ्या आणि आपले जीवन आनंदमय करा असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.त्यांच्या या भाषणास विद्यार्थ्यांनीही खूप छान प्रतिसाद दिला.त्यानंतर दुपारी नाटके,कविता,कथा,कादंबरी,वैज्ञानिक,ऐतिहासिक, सामाजिक विषयांची पुस्तकांची मांडणी करुन पुस्तक वाचन हा कार्यक्रमही घेण्यात आला.यास पालकवर्ग,शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
तिसऱ्या दिवशी १३ एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनुजा केळकर मॅडम यांचा वाढदिवस साजरा करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग चित्र दाखवून त्याविषयी माहिती देण्यात आली. दुपार नंतर पुन्हा वाचन व संध्याकाळी १४ एप्रिलची पूर्वतयारी करण्यात आली. दि.१४ एप्रिल २०२६ सकाळी विद्यार्थ्यांनी पुन्हा विविध रांगोळी व वर्गसजावट करण्यात आली.महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील गाणी लावण्यात आली.त्यानंतर दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचा संघर्ष हा समतेसाठी होता.त्यांनी सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी केलेला संघर्ष आपण लक्षात घेवूया व शिक्षणाची कास धरुया असे विद्यार्थ्यांना कळकळीचे आवाहन उपशिक्षक श्री. राजेश पवार केले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकर्ते व सभासदांनी सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका श्रीम.अनुजा केळकर यांची प्रेरणा होती तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. राजेश पवार सर यांनी केले होते.



