
चिपळूणमध्ये भाजपाने उभारलेल्या लोखंडी फलकाविरोधात नगर परिषद कारवाईच्या तयारीत
चिपळूण नगर परिषद हद्दीत भारतीय जनता पक्षाने लावलेल्या कायमस्वरूपी लोखंडी फलकांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. नगरपरिषद प्रशासनाने भाजपला नोटीस बजावत संबंधित फलकांविषयी खुलासा मागितला असून, परवानगी नसेल तर सात दिवसात ते हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
न.प.कडून देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, शहरातील खाजगी तसेच शासकीय जागांवर भाजपचे लोखंडी फलक कॉंक्रिटीकरण करून कायमस्वरूपी उभारण्यात आले आहेत. या फलकांसाठी न.प.कडून अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे की नाही, याबाबत पक्षाकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
www.konkantoday.com




