गुरव ज्ञाती समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; सांस्कृतिक कार्यक्रमांची लयलूट

रत्नागिरी : वाशी (मुंबई) येथील गुरव ज्ञाती भवन येथे गुरव ज्ञाती समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनासाठी समाजातील सभासद आणि ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​गुरव ज्ञाती समाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, उपाध्यक्ष गणपत लाड, उपाध्यक्ष विलास गुरव, प्रमुख कार्यवाह राजेंद्र गुरव, सहकार्यवाह विलास गुरव, सहकार्यवाह किशोर गुरव, खजिनदार सुभाष चव्हाण, अंतर्गत हिशोब तपासणीस रघुनाथ गुरव, दल प्रमुख दत्तराम गुरव व इतर पदाधिकारी आणि विवाह कमिटी सदस्य अनंत गुरव, मोहित चव्हाण, महेश गुरव, अनिल गुरव, विश्वस्त शंकर गुरव, सौ. सुजाता पवार सर्व सदस्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर श्री सत्यनारायण पूजा झालीं. या धार्मिक वातावरणात श्री धूतपापेश्वर कला भवन येथील ‘श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ, धोपेश्वर’ यांनी आपल्या सुस्वर भजनांनी उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर महिलांसाठी आयोजित ‘हळदी-कुंकू’ समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये दोन भाग्यवान महिलांना सौ. रेश्मा गुरव, सौ. सुजाता पवार आणि अश्विनी चव्हाण यांच्या हस्ते पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले. सत्यनारायण पूजेनंतर सर्व ज्ञातीबांधवांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोकणची लोककला असलेल्या ‘श्री आई जाखादेवी नमन मंडळ, भालावली (ता. राजापूर)’ यांचे नमन! या नमनाचा सर्व रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.

​कार्यक्रमाच्या मध्यंतरात प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र नरोटे यांना संस्थेचे प्रमुख कार्यवाह राजेंद्र गुरव यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. जाखादेवी नमन मंडळाचे सूत्रधार विश्वास गुरव यांचा सत्कार सहकार्यवाह किशोर गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. गुरव ज्ञाती रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष मंगेश गुरव आणि इतर पदाधिकारी, सदस्य संमेलनात उपस्थित होते. मंगेश गुरव यांचा सत्कार संस्थेचे सहकार्यवाह विलास गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.
या वार्षिक स्नेहसंमेलनास अनंत केटरर्सचे नागेश वंजारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते त्यांचा श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
​संस्थेच्या वतीने पोलीस प्रशासनाचे त्यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य केले, त्या सर्वांचे संस्थेचे उपाध्यक्ष गणपत लाड यांनी आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button