कोंडगाव सरपंच पोटनिवडणूक : धनश्री जोशी ५७ मतांनी विजयी


संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे झालेल्या सरपंच पोटनिवडणुकीत धनश्री राजेंद्र जोशी यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केला. त्यांनी प्रतिस्पर्धी रूपाली राजेंद्र कीर यांचा ५७ मतांनी पराभव करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली.

या निवडणुकीत एकूण १३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये धनश्री जोशी यांना ६८५ मते मिळाली, तर रूपाली कीर यांना ६२८ मते मिळाली. तसेच २० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. संपूर्ण निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. अखेर धनश्री जोशी यांनी थोडक्यात आघाडी घेत विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button