आ.किरण (भैय्या) सामंत आमदार चषक २०२६ जल्लोषात संपन्न..

दादा येडगे मित्र मंडळाच्यावतीने दुसऱ्या पर्वाचे अनोखे आयोजन

शनिवार दि २५एप्रिल व रविवार दि.२६ एप्रिल रोजी दोन दिवस अखंड राजापूरवासीयांसाठी क्रिकेटची पर्वणी ठरली. कार्यसम्राट आमदार, किंगमेकर किरण भैय्या सामंत यांच्या नावाने आमदार चषकाचे भव्यदिव्य आयोजन दादा येडगे मित्र मंडळाच्यावतीने अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या भव्य पटांगणावर आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदवला.
२ दिवस सुरू असलेल्या क्रिकेटच्या घमासानात प्रत्येक संघ सरशी साधण्यासाठी सर्वोतोपरी पराकाष्ठा करत होता.शेवटी फायनलमध्ये पेंडखले, आणि कोतापूर संघांनी मजल मारली. तर अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ प्रथम क्रमांकाच्या ५१०००/- पारितोषिकासाठी उभे ठाकले. शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर ग्रामीण इलेव्हन पेंडखळे संघाने मजल मारुन आमदार चषकावर आपले नाव कोरले. तर कोतापूर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
दादा येडगे मित्र मंडळाच्यावतीने सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. यात मुख्य चेहरा दादा येडगे त्यांच्या सोबतीने मार्गदर्शक म्हणून गणेश आडीवरेकर,प्रविण कानडे, अमित साळवी, सुरेंद्र सौंदळकर, योगेश चव्हाण, मंदार गीतये, मंदार राजये, राजेश झोरे, विनायक चव्हाण तर संयोजक म्हणून राम जांगळे, राजू वरक,तानाजी शेळके, सुरेश बावदाने, संदेश झोरे, प्रदीप झोरे, सुनिल झोरे, संजय बावदाणे यांनी विशेष मेहनत घेतली.

बक्षीस समारंभास सन्मा. आमदार किरण भैय्या सामंत साहेब जातीने हजर होते. सोबतीने तालुकाप्रमुख दीपक नागले साहेब, माजी नगरसेवक आत्माराम चाचे, विश्वास राघव, नगरसेवक सुबोध पवार अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खास गावावरून या स्पर्धेसाठी उपस्थित मनीष लिंगायत, विभाग प्रमुख शैलेश साळवी, प्रसाद गुरव, प्रज्योत खडपे, महेश नकाशे, प्रल्हाद नारकर ,गणेश पाष्टे ,गौरव सौरप, उपस्थित होते. स्वागत समारंभासाठी श्री. राम जांगळे यांनी जबाबदारी हाताळली. तरुणाईसाठी एक आगळी ऊर्जा देणारा आमदार चषक २दिवस पार पडला.येणाऱ्या काळात क्रिकेटसाठी आणि मतदारसंघासाठी भरीव कामगिरी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा आमदार साहेबांनी अधोरेखित केले. सदर स्पर्धेला जवळपास ६०० खेळाडू, तर मान्यवर आणि अन्य मिळून तेवढेच प्रत्यक्षदर्शी हजर होते. सोबतच Youtube Live दरम्यान तब्बल १५ हजार प्रेक्षकांनी याचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button